Monday, December 6, 2010

जयबद महारकिल्ला

जयगड बंदर व किल्ला
जिंदाल प्रकल्पामुळे चर्चेत आलेले जयगड निसर्गसौदर्यानेही नटलेले आहे. येथे असणारा जयगड किल्ला, लाईट हाऊस आणि सुप्रसिद्घ जयगड बंदर या प्रसिद्धीत आणखी भर घालतात. जयगड हे रत्नागिरी तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव आहे. यापुढे खाडी ओलांडल्यावर गुहागर तालुक्याला सुरुवात होते. जयगड बंदर हे अरबी समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात सुरक्षित बंदर मानले जाते कारण हे बंदर दोन डोंगरांच्या मध्ये वसलेले असल्याने बंदरात उभ्या राहणाऱ्या बोटींना कोणताच धोका संभवत नाही. पन्नाशीच्या दशकात जेव्हा गोवा-मुंबई सागरी वाहतूक भरात होती त्यावेळी जयगड एक महत्त्वाचं बंदर होतं. परंतु ही वाहतूक कमीकमी झाल्यावर जयगडचं महत्त्व कमीकमी होत गेलं आणि ते एक रिमोट प्लेस म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
जयगड किल्ला विजापूरच्या सुलतानाने जवळपास २०० वर्षांपूर्वी बांधला असावा. या किल्ल्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. किल्ला बांधत असताना प्रवेश द्वाराचे बांधकाम सतत कोसळत होते. यावर उपाय म्हणून एक नरबळी द्यावा असे ठरले. त्यावेळी जयबद महार हा बळी जाण्यास तयार झाला परंतु त्याने अशी अट घातली की किल्याला त्याचे नाव द्यावे. यथावकाश त्याचा बळी दिला गेला व किल्ल्याचे बांधकामही उत्तम झाले. परंतु अटीप्रमाणे किल्ल्याला जयगड असे नाव दिले गेले. शिवाजी महाराजांच्या राज्यात या किल्याची जबाबदारी आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्याकडे दिली गेली होती. यानंतर १८१८मध्ये ब्रिटीशांनी हा किल्ला घेतला. किल्ल्यावर महालक्ष्मी सोनसाखळीचे सुंदर मंदिरही आहे.
किल्ल्यातील आणखी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे जयगड लाइट हाऊस. दाभोळ ते रत्नागिरी हा प्रवास करणाऱ्या बोटींना मार्ग दाखवण्याचे काम हे लाइटहाऊस करते. निवळी फाटय़ावरून जयगड ३५ किमी लांब आहे. उन्हवरं
गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी उन्हवरे प्रसिद्घ आहे. दापोलीपासून २० किमीवर असलेल्या या छोटय़ाशा गावाचं वैशिष्टय़ आहे इथले गरम पाण्याचे झरे. सल्फरयुक्त पाण्याच्या ह्या झऱ्यात स्नान करण्याने अनेक त्वचारोग बरे होतात असे मानले जाते. दापोलीवरून उन्हवऱ्याला जायला एसटी बसेस आहेत त्याचप्रमाणे पन्हाळेकाजीची लेणीही इथे जवळच आहेत.

No comments:

Post a Comment